लक्ष्मी आनंद विद्या मंदिर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक समता दिवस म्हणून संपन्न
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
शाहू महाराजांचे गुणगान गुणगौरव करणारे काव्यवाचन इयत्ता सातवी मधील आलिया पठाण व स्नेहा जगताप या विद्यार्थिनींनी केले. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांचे संपूर्ण जीवन चरित्र त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांना समजावे म्हणून शिक्षक मनोगत मधून अश्विनी चौधरी मॅडम यांनी आपले भाषण व्यक्त केले. तसेच सामाजिक न्याय म्हणजे काय? तो शाहू राजांनी आपल्या राज्यकारभारामध्ये कशाप्रकारे राबविला याविषयी विविध उदाहरणातून शिक्षक मनोगतातून युवराज वजाळे सर यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच शाहू राजांच्या प्रखर बुद्धी विषयी बोलताना विद्यार्थ्यांनी कोणकोणते गुण आत्मसात करावे याविषयी प्राचार्य विकास करळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग हा उत्स्फूर्त व अ वर्णनीय होता.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे, सचिवा सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जयंती उत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य विकास करळे पीआरओ सागर खुळे इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment