गोसेवा कार्याची दखल; रुद्रप्पा बिराजदार यांना 'शेणाची घडी' देऊन गौरव
(कटूसत्य वृत्त):- जून 2026 रोजी महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग यांच्याकडून राज्यमाता गोमाता संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर निघाली आहे. सोलापूर जिल्ह्यात यात्रेचे कार्यक्रम निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. सदर यात्रेचे सोलापूर जिल्ह्यात आगमन पासून कार्यक्रम संपन्न होईपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ समाजसेवक रुद्रप्पा बिराजदार यांना शेणाची घडी देऊन महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग अध्यक्ष श्री शेखरजी मुंदडा यांच्याकडून सत्कार करण्यात आले. याप्रसंगी ह भ प गहिनीनाथ औसेकर महाराज, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, गोसेवा आयोग सदस्य डॉ.श्री सुनील सूर्यवंशी व श्री उद्धवजी नेरकर, श्री नितीन चिलवंत, श्री अमोल उंबर्जे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्री अनिल तांबे, डॉ. धनंजय गिड्डे, यांच्यासह अनेक मान्यवर, गोरक्षक, गोभक्त, सोलापूर जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment