राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी सिंहगडचा संघ गोव्याकडे रवाना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी सिंहगडचा संघ गोव्याकडे रवाना

 राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी सिंहगडचा संघ गोव्याकडे रवाना




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथील हँडबॉल संघाने राष्ट्रीय पातळीवर दमदार झेप घेतली असून गोवा राज्यातील मडगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. या यशामुळे परिसरात अभिमानाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या राष्ट्रीय स्पर्धेत शाळेचे अंडर-12 मुली, अंडर-17 मुलांचे आणि मुलींचे असे एकूण तीन संघ सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत या संघांनी राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.
संघाच्या शुभेच्छा समारंभात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव येथील कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून खेळाडूंना आत्मविश्वास, शिस्त आणि चिकाटी यांच्या जोरावर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा सल्ला दिला.


“तुमच्यातील जिद्द आणि संघभावना तुम्हाला निश्चितच यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. शाळेचे व राज्याचे नाव उंच करा,” असे उत्साहवर्धक उद्गार त्यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांपासून कठोर सराव केला आहे. क्रीडा शिक्षक राजू ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शाहीन शेख, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, उपमुख्याध्यापिका निकहत शेख यांनीही संघाला शुभेच्छा दिल्या.


पालक व शिक्षकवर्गानेही खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages