सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 26, 2026

सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

 सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. शाळेत १९९१ या वर्षात शिकलेले माजी विध्यार्थी यात सहभागी झाले होते. ३५ वर्षानंतर भेट झाल्यामुळे हे माजी विधार्थी भारावले होते. मुख्याध्यापक काशिनाथ आकाशे यांनी पेन व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून अंबण्णा कल्याणशेट्टी, राजेंद्र कलशेट्टी, योगिनाथ चांगले, रामचंद्र बिराजदार आदी उपस्थित होते. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तब्ब्ल 35 वर्षानंतर एकमेकांची भेट झाल्याने वातावरण देखील भावुक झाले होते. अनेक विध्यर्थ्यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. शाळेमुळेच आपली प्रगती झाल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी सुनिल चव्हाण,गुरुप्रसाद तिवारी, गणेश कोरे,अमित सुमंत
भारत साळुंखे, रोशनी शेंडगे, अबेदा शेख, 
अतुल भोसले, , चंद्रकला सोलापूरे, राहुल ननावरे,  राजेंद्र इंगळे राहुल जाधव, बाळु कांबळे
प्रमोद चव्हाण, राजाराम देठे, अंबरनाथ पाटील,
अनिता जगताप, नागनाथ गवंडी,
वैभव वायचळ, विदुला बनसोडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages