छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- नामवंत धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाली. शिवकालीन पराक्रमाची आठवण करून देणारे थरारक सादरीकरण यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झालेले होते. विविध देखावे बघण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गावर दुतर्फा गर्दी झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय...! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय...! च्या जय घोषाने आसमंत दुमदुमला होता.
दरम्यान मिरवणुकीस प्रारंभ राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आई तुळजाभवानी माता, धर्मवीर शंभूराजे यांच्या पूजनाने, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी, पोलीस निरीक्षक दिपक भिताडे, उपनगराध्यक्ष ऋतुराज (बंटी) राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.बी. बागाव, नगरसेवक यशवंत धोंगडे, अविनाश मडीखांबे, तम्मामामा शेळके, नावेद डांगे, नन्नू कोरबू, सचिन शिंदे, मनोज निकम, इंजी. वरुण शेळके, प्रवीण देशमुख, सुहास सुरवसे, राहुल शेळके, अनिल मोरे, विजय लांडगे, शरणप्पा कापसे, विश्वजित पाटील, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अतिश पवार, सिद्धाराम टाके, सिद्धाराम माळी, ऋषी लोणारी, निशांत कवडे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
या निघालेल्या मिरवणुकीत अंबारीत छत्रपती शिवाजी महराजांची मूर्ती, सह्याद्री प्रतिष्ठान कराड आयोजित लाठी-काठी, तलवारबाजी तसेच कलारत्न फाउंडेशन मंगळवेढा यांचे “गाथा स्वराज्य रक्षकाच्या बलिदान व स्त्री सुरक्षितता हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती तर सातारा येथील कांतारा चित्रपटातील प्रसंगावर आधारित सजीव देखावे सादर करण्यात आले होते. आई तुळजाभवानी मातेचा भव्य देखावा असे विविध देखावे बघण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गावर दुतर्फा गर्दी झालेली होती. कलाकारांनी साकारलेल्या या देखाव्यांनी मिरवणुकीत उत्साह निर्माण झालेला होता.
सदरची मिरवणूक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक ते महर्षी वाल्मिकी मार्ग, विजय चौक, तारामाता चौक, कारंजा चौक, मेन रोड, वीर सावरकर चौक (तूप चौक), सेन्ट्रल चौक (सोन्यामारुती चौक), सर्जेराव जाधव पथ, समर्थ चौक, राजे फत्तेसिंह चौक येथे येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मिरवणूक यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अतिश पवार, भरत राजेगांवकर, देविदास गवंडी, सुरज भोसले, गणेश पाटील, प्रसाद मोरे, अजय वाझरे, दिनेश पाटील, लक्ष्मण शिंदे, राजाराम पवार, अभिषेक चव्हाण, शरद भोसले, आनंद पवार, सागर शिंदे, केदार तोडकर, धनंजय गडदे, लखन आवटे, सचिन बिराजदार, अमित कोळी, बसवराज भोळे, विष्णू गुंठे, रवी पोळ, मल्लिकार्जुन निलोगीकर, लक्ष्मण नागेशी, योगेश पवार, बसवराज स्वामी, प्रशांत बंदिछोडे, संकेत बिराजदार, अंबादास शिंदे, गौरव लोकापुरे, सुजल नरोणे, दत्ता मोरे, समर्थ नडगिरे, प्रसाद चव्हाण, समर्थ जामदार, अभिषेक कोळी, समर्थ वाघमारे, रुद्रा पाटोळे, सुरज जाधव, ओंकार तालीकोटे, राहुल तालीकोटे, कृष्णा नरवडे, किशोर ढंगे, आकाश मदने, प्रशांत पवार, विठ्ठल बोळकोटे आदिजनांनी परिश्रम घेतले.
चौकट :-
*उत्कृष्ट नियोजन –*
धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतिश पवार यांच्या कुशल नियोजनाने सदरची निघालेली मिरवणूक ही शिस्तबद्ध व सांस्कृतिक पद्धतीने पार पडली. समाजामध्ये ऐक्य, संस्कार आणि शिवप्रेम जागृत करण्याचा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. उत्सव कसा असावा हे या माध्यमातून पाहायला मिळाल्याने शिवप्रेमीतून कौतुक व्यक्त होत होते. एक उत्कृष्ट नियोजनाचा नमुना या मिरवणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे.

No comments:
Post a Comment