अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थींचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 19, 2026

अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थींचा सत्कार

 अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थींचा सत्कार


अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मल्लिकार्जुन मंदिरात शनी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्याच बरोबर वीरशैव लिंगायत समाजातील इयत्ता दहावी व बारावीत परीक्षेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला होता. यामध्ये सतरा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
             सकाळी शनी महाराज यांच्या मुर्तींची अभिषेक व महापूजा रविशंकर गुळवे यांच्या हस्ते संपन्न झाली व समाजातील दहावी बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार समाजाच्या वतीने शाल,श्रीफळ,एक वृक्ष व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये बारावी इयत्तेतील पाच विद्यार्थी व दहावी इयत्तेतील बारा विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत.या कार्यक्रमाच्या शेवटी समाजाच्या वतीने समाज बांधवांसाठी महाप्रसादाची (भोजनाची) उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages