नीरा नरसिंहपूर येथे श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांकडून नदी स्वच्छता मोहीम
अकलूज (कटूसत्य वृत्त):- नदी स्वच्छता व जल संवर्धन अभियान २०२६ अंतर्गत नदी हीच माता,तीच आपली जीवनदाता ! आहे त्यामुळे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) श्री स्वामी समर्थ केंद्र अकलूज व माळीनगर (जि.सोलापूर) यांच्या वतीने पर्यावरण प्रकृती विभागाच्या वतीने गंगा दशहरा सप्ताह निमित्त नीरा नरसिंहपूर येथील संगमावरील नीरा-भीमा नदी किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.
यावेळी केंद्रातील सेवेकरी परिवारातील महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नदी परिसराची स्वच्छता केली.नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
*“स्वच्छ नदी – निरोगी पर्यावरण”*
हा संदेश देण्यात आला. उपस्थितांना नदीचे पावित्र्य जपण्याची,प्लास्टिक व कचरा नदीत न टाकण्याची आणि नदी संवर्धनासाठी सतत प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली.या कार्यक्रमा दरम्यान नदी पूजन करून नदीचा मानसन्मान सेवा रुजू करण्यात आली.पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनाच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
या अभियाना अंतर्गत नदी परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी श्रमदान करण्यात आले.तसेच नीरा-भीमा नदीची पूजा देखील करण्यात आली.नदी स्वच्छतेच्या या पवित्र कार्यानंतर देवस्थानच्या मंदिरामध्ये सर्व सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन अत्यंत भक्तीभावाने 'संक्षिप्त भागवत पाठ' केला.या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थानच्या वतीने उपस्थित सर्व सेवेकऱ्यांसाठी महाप्रसादाची (भोजनाची) उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

No comments:
Post a Comment