वैराग पोलिसांची मोठी कारवाई : प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त
वैराग (कटूसत्य वृत्त):- वैराग पोलिसांनी भातंभरे परिसरात कारवाई करत एका दुचाकीवरून वाहतूक होत असलेला प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारीचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ₹१,१८,३३० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ९:२५ वाजता पोलिस पेट्रोलिंगदरम्यान शेख हसिफ अल्लाउद्दीन (रा. आंबेहोळ, जि. धाराशिव) याच्याकडून हिरो स्प्लेंडर (MH-25 AU-7366) या दुचाकीवरून बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे आढळले. पोलिसांनी पंचांसमक्ष १२ गोण्या जप्त करून पुढील तपासासाठी अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली.
अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी यांनी वैराग पोलीस ठाण्यात जाऊन तपासणी केली असता जप्त मालामध्ये विविध प्रकारचे गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये विमल पानमसाला, बादशाह गुटखा, KR-1000 गुटखा, जाफरानी जर्दा आदी प्रतिबंधित पदार्थांचा समावेश आहे.
जप्त मुद्देमालाची किंमत ₹७८,३३० असून वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी अंदाजे ₹४०,००० किमतीची आहे. अशा प्रकारे एकूण ₹१.१८330 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या प्रतिबंधात्मक अधिसूचनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असून पुरवठादार व साठा मालकांचा पुढील तपास सुरू आहे. हे कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व डी.बी. बदकातील पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी केली.

No comments:
Post a Comment