महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचा व्दितीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2026

महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचा व्दितीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ संपन्न

 महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचा व्दितीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ संपन्न




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालयात बी एड् व्दितीय वर्षाचा शुभेच्छा समारंभ घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रामचंद्र गायकवाड व उत्कर्ष शेटे होते.या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
             प्रास्ताविक प्रा.ए.एम.तोरणे सर यांनी महाविद्यालयाची व संस्थेची माहिती विद्यार्थांना सांगितले तर सर्व विद्यार्थांचा मान्यवरांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमात निहाल गिरमे,कोमल गायकवाड,दिग्विजय गुरव,आरती गोसावी व प्रा.एम.बी.देवकर यांनी मनोगत व्यक्त केली.प्रमुख पाहुणे उत्कर्ष शेटे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,भविष्यात शिक्षक म्हणून जात असताना आपले अध्यापनाचे चांगले करावे व शिक्षणातून भारताची भावी पिढी आदर्श घडवावी असे आवाहन केले.प्रा.यु.डी हेगडे मॅडम यांनी प्रतिज्ञा वाचन केले.प्राचार्या डाॅ.जयश्री धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयात मिळालेल्या संस्काराचा वापर आयुष्यभर आपल्या जीवनात करावा व निष्ठेने व प्रामाणिक कार्य करावे.
          या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.प्रतिक्षा कौलगे व कु.मधुरा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रध्दा जाधव यांनी मानले.मिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages