शंकरनगर-अकलूज येथील डाॅक्टर शाहनूर शेख बनल्या वकील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 20, 2026

शंकरनगर-अकलूज येथील डाॅक्टर शाहनूर शेख बनल्या वकील

 शंकरनगर-अकलूज येथील डाॅक्टर शाहनूर शेख बनल्या वकील





अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरनगर-अकलूज येथील कर्तृत्ववान महिला डॉक्टर शाहनूर शाहजहान शेख यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच कायद्याच्या क्षेत्रातही यश मिळवत इतर महिलांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.एक मुस्लिम महिला म्हणून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक अडचणींवर मात करत डॉक्टर आणि वकील या दोन्ही पदव्या संपादन केल्या आहेत.
              रुग्णसेवा करत असताना समाजातील अनेक कायदेशीर अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. त्यामुळे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला.हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळत त्यांनी अथक परिश्रम करून कायद्याची पदवी संपादन केली आहे.डॉ.शाहनूर शेख यांचे हे दुहेरी यश केवळ वैयक्तिक नाही तर समाजासाठीही महत्त्वाचे आहे. वैद्यकीय आणि कायदे या दोन्ही क्षेत्रातील ज्ञानामुळे त्या अधिक प्रभावीपणे समाजसेवा करू शकतील.त्यांच्या या कामगिरीमुळे विशेषतः मुस्लिम महिलांसाठी त्या एक प्रेरणास्थान ठरत आहेत. “शिक्षण, जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते,” हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून समाजाच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान निश्चितच मोलाचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages