प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!” - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2026

प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!”

 प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवा; दिखाऊ काम नको, निकाल हवा!” 

 चेतनसिंह केदार सावंत यांचे स्पष्ट आदेश







सोलापूर (कटूसत्य वृत्त): जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कामाला लागावे, असा कडक इशारा देत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी पदभार स्वीकारताच शिक्षण विभागाला स्पष्ट दिशा दिली. “फक्त कागदोपत्री काम नको, प्रत्यक्ष निकाल दिसला पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्राथमिक शाळांचा पट वाढला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. विद्यार्थ्यांची  शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील रहावे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन कल्पना अंमलात आणाव्यात. आदर्श शाळा, गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांना पाठबळ द्यावे. शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. राज्यात नावलौकिक होईल असा शिक्षण विभागाने कारभार करावा अशा सूचना देत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. 
      जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर नतमस्तक होऊन सभापती पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सांगोला पंचायत समितीच्या सभापती पुनम इंगवले, बाळासाहेब एरंडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, योगेश पाटील, दत्ता जाधव, उमेश पाटील, उपसभापती अजय सरगर, युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील, योगेश खटकाळे, बाळासाहेब आसबे, दुर्योधन हिप्परकर,  बाळासाहेब काटकर, संभाजी आलदर, पंचायत समिती सदस्य डॉ.सदाशिव दबडे, पंचायत समिती सदस्य बापू जावीर, जुबेर मुजावर,अफजल शेख, संजय केदार, सचिन देशमुख, महावीर कदम, मदन दराडे, लतिफ तांबोळी, राजेश शिंदे, अमोल कुलकर्णी, शिवराज पुकळे, नितीन मोहिते, अविनाश गोरे, डॉ.अविनाश खांडेकर,सुधीर गाडे, विशाल बनसोडे, माजी सरपंच नंदकुमार दिघे, अनिल दिघे, पोपट गडदे, दादा खरात, बाळासाहेब झपके, प्रशांत वलेकर, अनिल केदार अण्णा पाटील, प्रकाश घोडके, अंकुश आवताडे, बाळासाहेब केदार, संभाजी चव्हाण, अजित गोडसे, अमोल साखरे, राहुल केदार, यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 
      यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षण विभागाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार यांनी शिक्षण विभागाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहावे. गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. 




चौकट १
जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी गुरुवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांडसमळा वाढेगाव, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाढेगाव व 
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आंधळगाव या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा, तपासणी यंत्रणा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींची सखोल पाहणी करण्यात आली.ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने सेवा मिळावी, यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करावे आणि कोणत्याही रुग्णाला उपचाराविना परत पाठवू नये, असे निर्देश पाहणीत देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून सुविधा सुधारण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी अचानक भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा व स्वच्छतेची पाहणी केली. रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages