मोहोळ यात्रेत यात्रेकरूंना थंड पाणीचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

मोहोळ यात्रेत यात्रेकरूंना थंड पाणीचे वाटप

 मोहोळ यात्रेत यात्रेकरूंना थंड पाणीचे वाटप

इनामदार परिवाराचा स्तुत्य उपक्रम



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रखर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यात्रेत यंदा मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. यात्रा आणि कुस्तीच्या दिवशी या दोन दिवसांत तहानलेल्या यात्रेकरूंसाठी नागनाथ गल्लीतील यासीन इनामदार परिवाराच्या वतीने मोफत थंड पाण्याचे वितरण करून एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवला.

या सेवाकार्यात इनामदार कुटुंबातील इतर सदस्यांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शकील इनामदार, बिलाल इनामदार, शाहेबाज इनामदार, इरफान इनामदार आणि जुबेर इनामदार यांनी देखील यात्रेकरूंना स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था करून सेवाभाव जपला.

तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्म्याची तीव्रता जाणवत असताना, या उपक्रमामुळे अनेक यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळाला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages