ट्रॅक्टर उलटून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी येथील संतोष आबा धाईंजे (वय 32) यांचा ट्रॅक्टर अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धाईंजे हे पाटील वस्ती येथील ‘भाग्यश्री तू या’ हॉटेलमध्ये काम करत होते. शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले नव्हते. त्याच दिवशी सचिन शिंदे राहणार बागेचीवाडी यांनी सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर संतोष यांना चालवण्यासाठी दिला होता.
संतोष हे शेतातील तालीवरून ट्रॅक्टर चालवत असताना अचानक तोल जाऊन ट्रॅक्टर उलटला. या अपघातात ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना अत्यंत दुर्दैवी असून अचानक घडलेल्या या प्रसंगाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत संतोष धाईंजे यांच्या पश्चात दोन महिन्यांपूर्वीच बायपास शस्त्रक्रिया झालेली आई, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे गावात व परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

No comments:
Post a Comment