सोलापूरात LPG दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

सोलापूरात LPG दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा इशारा

 सोलापूरात LPG दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा इशारा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत ऑटो रिक्षासाठी वापरल्या जाणाऱ्या LPG इंधनाच्या दरवाढी, कमतरता आणि चालकांच्या आर्थिक अडचणींबाबत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील विविध LPG पंपांवर वेगवेगळे दर आकारले जात असून काही ठिकाणी ₹८५ ते ₹८७ तर काही ठिकाणी ₹१८२.९५ प्रति लिटर दराने विक्री होत आहे. यामुळे रिक्षाचालकांवर मोठा आर्थिक भार पडत असून मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

तसेच LPGची कमतरता असल्याने चालकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. परिणामी अनेक रिक्षा बंद पडल्या असून दैनंदिन उत्पन्न ठप्प झाले आहे. याचा परिणाम चालकांच्या कुटुंबांवर होत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महासंघाने दर एकसमान करणे, पंपांची चौकशी, पुरवठा सुरळीत करणे तसेच बँक व फायनान्स वसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, प्रदीप आबा शिंदे, इरफान कल्याणी, सरफराज बागवान, लाडजी नदाफ, यासह वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages