'वटवृक्ष देवस्थानच्या कार्यातून धर्म, अध्यात्म व समाजसेवेचा त्रिवेणी संगम'
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधेसह निवासाची व्यवस्था संस्थानच्या वतीने करत असल्याचे समजले होते. समाज कार्य करणाऱ्या व स्वामीवर गाढ श्रद्धा ठेवून अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला भेटल्याचा आनंद झाला. त्यांची कल्पकता त्यांचा दूरदृष्टीकोन व भविष्यातील अनेक योजना ऐकून मी भावूक झालो. आज स्वामी दर्शनानंतर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यातून 'धर्म, अध्यात्म व समाजसेवेचा' त्रिवेणी संगम अनुभवला असल्याचे मनोगत सोलापूर जिल्हा न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी सुनील
गावडे यांनी व्यक्त केले.
येथील श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयात मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी न्यायदंडाधिकारी सुनील गावडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना न्यायदंडाधिकारी गावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रथमेश इंगळे, समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment