नातेपुते येथील महेश पांढरे यांची पीएसआयपदी निवडीबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील महेश विठ्ठल पांढरे यांची एमपीएससी परीक्षेत यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या निवडी बद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महेश पांढरे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या तसेच महेश पांढरे यांचे नातेपुते शहरात त्यांच्या यशाची मिरवणूक काढून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.महेश पांढरे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण नातेपुते येथील बा. ज. दाते प्रशालेत त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी पुणे येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले असून ते इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी महेश यांच्यावर आली. वडिलांची अधिकारी होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंजिनिअरिंगची नोकरी सोडून एमपीएससीची तयारी सुरू केली आणि अखेर पीएसआय पदावर निवड मिळवली. या यशामागे आई व बहिणींचा भावनिक आधार तसेच वडिलांनी दिलेली अधिकारी होण्याची प्रेरणा कारणीभूत असल्याचे महेश पांढरे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीनंतर शहरातील विविध सामाजिक संस्था, राजकीय, शैक्षणिक, क्रीडाक्षेत्र, गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळी :
पीएसआयपदी निवडीबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान घेताना महेश पांढरे

No comments:
Post a Comment