ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम (नाना) मस्के यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 25, 2026

ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम (नाना) मस्के यांचे निधन

 ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम (नाना) मस्के यांचे निधन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती आणि शिवसेनेचे निष्ठावान उपजिल्हाप्रमुख तुकाराम (नाना) मस्के यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
संघटनेचा खंदा आधारस्तंभ हरपला
तुकाराम मस्के हे शिवसेनेतील एक ज्येष्ठ आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जात. त्यांनी संघटनेच्या वाढीसाठी आणि संघटनात्मक बांधणीत मोलाचे योगदान दिले होते. सोलापूर महानगरपालिकेत परिवहन सभापती म्हणून त्यांनी प्रभावी काम केले होते.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. नाना मस्के यांच्या पश्चात त्यांच्या मागे मोठा परिवार आणि मित्रपरिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages