आयुष्यमान आरोग्य अभियान मोहिमेचे जंगम यांच्या हस्ते उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 25, 2026

आयुष्यमान आरोग्य अभियान मोहिमेचे जंगम यांच्या हस्ते उद्घाटन

 आयुष्यमान आरोग्य अभियान मोहिमेचे जंगम यांच्या हस्ते उद्घाटन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक क्षयरोग दिना निमित्त सोलापूर जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयुष्यमान आरोग्य अभियान 100 दिवसाच्या विशेष मोहिमेचे उद्घाटन कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते निक्षय मित्रांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि क्षयरुग्णांना पोषण आहार किट (फूड बास्केट) वितरित करण्यात आले. मार्डी येथे संशयीतांचे एक्स-रे काढण्यात आले आणि जिल्हाभरात रॅली, रांगोळी स्पर्धा, आयुष्यमान आरोग्य शिबिरे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून क्षयरोगाविषयीची जनजागृती करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भारत देश क्षयमुक्त करण्याची शपथ दिली आणि चालू वर्षांमध्ये जास्तीत जास्त संशयतांना तपासून त्यांना उपचाराखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. समाजातील विविध घटकांना, नागरिकांना, संस्थांना, औद्योगिक क्षेत्रातील यांना रुग्णांना फूड बास्केट देण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. मोहन शेगर, सहसंचालक कुष्ठरोग, डॉ. एवळे, तालुका आरोग्य अधिकारी उत्तर, डॉ. निलम घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी दक्षिण, डॉ. विनोद अभिवंत , डॉ. सरोज बनसोडे, श्रीमती वैशाली थोरात, जिल्हा लेखा व्यवस्थापक, राजेंद्र पतंगे, सांख्यिकी अनिवेक्षक, मशाक मुजावर, कनिष्ठ लिपिक, अंटद, आरोग्य सहाय्यक, विजय शेगर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, राजकिरण भूताळे, जिल्हा पीपीएम समन्वयक, सोमनाथ गायकवाड, डॉट प्लस सुपरवायझर, सचिन भंडारे, लेखापाल, चौधरी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, निश्चय मित्र व क्षयरूग्ण आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages