पंढरपुरात मनसेकडून मुस्लिम बांधवांना भेटवस्तू वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

पंढरपुरात मनसेकडून मुस्लिम बांधवांना भेटवस्तू वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश

 पंढरपुरात मनसेकडून मुस्लिम बांधवांना भेटवस्तू वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश



पंढरपूर (कटूसत्य वृत्त): रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. प्रभाग क्रमांक १७ मध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून मुस्लिम बांधवांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल सावंत, नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, नगरसेविका माधुरीताई धोत्रे, संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे, तसेच नगरसेवक संजय बंदपट्टे, लोकेश यादव, देवमारे, विठ्ठल बंदपट्टे आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील बंधू-भगिनी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की, “सर्वधर्म समभाव हीच आपली परंपरा असून सर्वसामान्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करणे हे आमचे कर्तव्य आहे.” पुढील काळात प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवून विकासकामांच्या माध्यमातून प्रभागाला रोल मॉडेल बनविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपस्थित मान्यवरांनी धोत्रे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक १७ मध्ये विविध धर्मीय सण, उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून आणण्याचे काम सुरू असल्याने लवकरच या भागाचा चेहरामोहरा बदलून तो एक आदर्श प्रभाग म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages