सांगोला नगरपरिषदेमार्फत होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषदेच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ७ व ९ मार्च रोजी विविध स्पर्धा व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. ७ मार्च रोजी पाककला व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककला स्पर्धेकरिता प्रत्येकी ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाकरिता ठेवण्यात आले होते. ग्रुप डान्स स्पर्धेकरिता प्रत्येकी रुपये ७ हजार, ५ हजार व ३ हजार अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाकरिता ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे पाककला स्पर्धेमध्ये अफरीन पठाण, मनीषा हुंडेकरी, नीता लाटणे, राजाबाई मस्के व ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये युवा ग्रुप, सखी ग्रुप, धुरंदर ग्रुप, चौंडेश्वरी ग्रुप हे अनुक्रमे प्रथम द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी ठरले.
दि. ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली होम मिनिस्टर तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती छायाताई मेटकरी, डॉ. निकिताताई देशमुख, अपेक्षाताई पाटील, पंचायत समिती सदस्या राणीताई पाटील, वंदना शेळके, डॉ.
नेहा साळुंखे-पाटील, डॉ. मेघना देवकाते, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, सुनंदाताई घोंगडे,
पूजाताई पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका राणीताई माने यांनी केले तर निकिताताई देशमुख यांनी, छायाताई मेटकरी यांनी मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण समारंभात कवयित्री पुष्पाताई मिसाळ, मनीषा ठोंबरे, अर्चना देसाई, सुवर्णा तेली, हर्षदा गुळमिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सायली पाटील यांचाही सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे कर अधिकारी प्रियांका पाटील, अस्मिता निकम व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment