माळीनगर गट नंबर दोन येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 30, 2026

माळीनगर गट नंबर दोन येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी

 माळीनगर गट नंबर दोन येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी     




 


अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील माळीनगर गट नंबर दोन येथील श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने उत्साहात गुरुवारी साजरी करण्यात आली. श्रीराम मंदिर समिती व महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ,गट नंबर दोन यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. 
       श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिरात बुधवारी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व गुरुवारी पहाटे ४ ते ६ भजन व काकड आरती घेण्यात आली.त्यानंतर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह. भ. प. प्रकाश शिंदे महाराज यांचे रामायणचार्य फुलांचे कीर्तन झाले आणि त्यानंतर पूजा आणि राजेंद्र गायकवाड,दिलीप इनामके व सारंग भोंगळे यांचे हस्ते आरती करण्यात आली.
         गुरुवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत पूजा अभिषेक करण्यात आला. श्रीराम च्या घोषणांनी व रामनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. 
       यावेळी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र गिरमे, माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, कारखान्याचे माजी संचालक विलास इनामके, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे, खजिनदार ज्योतीताई लांडगे, संचालक डॉ.अविनाश जाधव,रत्नदीप बोरावके, कल्पेश पांढरे, दिलीप इनामके, शुगरकेन सोसायटीचे संचालक कुणाल इनामके, विशाल गिरमे, संचालिका विद्या गिरमे,माजी चेअरमन श्रीमती अवंतिका पांढरे, सुबोध गिरमे, पुष्कर इनामके, घनश्याम भोंगळे,राजेंद्र बधे,नागनाथ बधे,राहुल पांढरे,गणेश बोरावके,करण इनामके,बबलू पांढरे,सोहन इनामके,म.फुले पतसंस्थेचे सेक्रेटरी योगेश कचरे,आदी विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, म. फुले गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते,गट नंबर दोन येथील महिला मंडळातील महिलावर्ग,ग्रामस्थ उपस्थित होते.
             कार्यक्रमात भजन,कीर्तन आणि पारंपारिक पाळणा सादर करण्यात आला. स्थानिक भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्ती गीतातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळाला. राम जन्म सोहळ्यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम शांततेत,शिस्तबद्ध आनंदी वातावरणात पार पडला.श्रीराम नवमी उत्सवामुळे माळीनगर गट नंबर  दोन गावात धार्मिक एकात्मता बंधुभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. हा रामनवमीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंदिर समिती व महात्मा फुले गणेशोत्सव मंडळाचे सदस्य व महिला वर्ग यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages