सहकार महर्षि साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताह साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2026

सहकार महर्षि साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताह साजरा

 सहकार महर्षि साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताह साजरा




अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यात बुधवार दि. ४ मार्च ते ११ मार्च २०२६ या कालावधीमध्ये "राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाचे" आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी सहकार महर्षि व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. के. चौगुले यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रसंगी सी.एस. फडतरे (असि. इंजिनिअर) यांनी सर्व कामगारांना एकत्रितपणे सुरक्षिततेची शपथ दिली. उपस्थित सर्व कामगारांना सेफ्टी संदर्भातील व्हीडीओ फिल्म्स् दाखविण्यात आल्या. त्यावेळी सेफ्टी ऑफिसर  पी.बी. रणनवरे यांनी सुरक्षा सप्ताहामध्ये तसेच संपूर्ण वर्षभर सुरक्षितता पाळून काम करणेचे आवाहन केले.

त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. के. चौगुले यांनी आपल्या भाषणामध्ये ४ मार्च ते ११ मार्च २०२६ या कालावधीमध्ये औद्योगिक सेफ्टीबाबत, फायर ट्रेनिंग व पर्यावरण, माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल नेतृत्वाखाली कारखाना प्रगतिपथावर कार्यरत असून, कारखान्याने आजपर्यंत राज्यपातळीवर व देशपातळीवरील विविध पारितोषिके मिळवणारा, तसेच भारत सरकार कडून सलग आठ वेळेस नॅशनल सेफ्टी अॅवार्ड मिळवणारा कारखाना म्हणून ख्याती मिळविलेली आहे. सुरक्षितता, सुरक्षिततेची गरज, सुरक्षितता व्यवस्थापन, सुरक्षितता साधनांचा वापर, मॉक ड्रील, इलेक्ट्रीकल सुरक्षा, रस्ते सुरक्षा न वैयक्तीक घ्यावयाची काळजी आणि सुरक्षितता याबाबत सर्व कामगारांना सखोल मार्गदर्शन केले.

सुरक्षितता सप्ताहनिमित्त कामगारांमध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक  एस.एन. गोडसे, द्वितीय क्रमांक-एस.ए. लोहार, चारोळी स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक डी.एस. चव्हाण, द्वितीय क्रमांक- आर.एल. साळुंखे, तृतीय क्रमांक व्ही. के. गाडे, तसेच घोषवाक्य स्पर्धा प्रथम क्रमांक-आर.डी. रणनवरे, द्वितीय क्रमांक-एस.आर. कुंभार, तृत्तीय क्रमांक विभागुन जे. एरा. कावळे व एस.जी. दोशी यांना प्रशस्तीपत्रक देवून सन्मानीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमास कारखान्याचे कार्यलक्षी संचालक जे. एम. माने-देशमुख,सेक्रेटरी ए.व्ही. काटे, चिफ इंजिनिअर व फॅक्टरी गॅनेजर एस. के. गोडसे, चिफ अकौंटंट वाय.बी.इनामदार, चिफ केमिस्ट एस.एन. जाधव, शेतकी अधिकारी-आर.एस. चव्हाण, को-जन मॅनेजर-वाय. के. निंबाळकर, परचेस ऑफिसर आर. एस. गायकवाड, टाईम किपर-व्ही.आर. वाघ, पर्यावरण अधिकारी पी.एच. इनामदार, कॉम्प्युटर प्रोग्रामर एस.जी. नरसाळे, सिक्युरीटी ऑफिरार एन. सी. निंबाळकर, कारखान्याचे सर्व कामगार तरोच कामगार युनियन प्रतिनिधी उपस्थित होते. स्वागत व सुत्रसंचालन सेफ्टी ऑफिसर पी.बी. रणनवरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन आर. डी. रणनवरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages