इंद्रजीत पाटील छ.संभाजी महाराज पुरस्काराने सन्मानित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

इंद्रजीत पाटील छ.संभाजी महाराज पुरस्काराने सन्मानित

 इंद्रजीत पाटील छ.संभाजी महाराज पुरस्काराने सन्मानित



(वार्ताहर) (कटूसत्य वृत्त):- अॅग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट,फलटण,जि.सातारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार - २०२६ ने साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार त्यांच्या ' चिबाड ' या कवितासंग्रहास देण्यात आला आहे.प्रस्तुत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.श्रीमंत अनिकेतराजे ना.निंबाळकर,संमेलनाध्यक्ष प्रा.विजयजी काकडे,ज्येष्ठ साहित्यिक श्री.जगन्नाथ शिंदे,मा.अशाेकजी मेहता,कार्याध्यक्ष प्रा.महादेव शि.गुंजवटे,संयाेजक श्री.प्रकाश गणपतराव सस्ते,निमंत्रक ज्ञानेश्वर विश्वासराव देशमुख व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रा.इंद्रजीत पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.फलटणमधील नवलबाई मंगल कार्यालयात हे मराठी साहित्य संमेलन पार पडले.कवी इंद्रजीत पाटील यांच्या चिबाड या कवितासंग्रहास अल्पावधीतच मिळालेला हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. ग्रामीण भागातील या हरहुन्नरी लेखकाचे सर्वत्र कौतुक असून मा.माधवरावजी कुतवळ,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages