Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्र्यांना नडला आणि भाजप आमदाराला भिडला

 पालकमंत्र्यांना नडला आणि भाजप आमदाराला भिडला




 सोलापुरात एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने 'गड' जिंकला!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 7 मधील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.मराठा समाजातील दोन दिगग्ज नेते भाजप आणि शिंदेंची शिवसेना घेऊन आमनेसामने आले होते.पद्माकर नाना काळे (भाजप) आणि अमोल शिंदें(शिवसेना शिंदें पक्ष) यांच्यातील तगड्या फाईट कडे सर्व सोलापूरकरांचे लक्ष लागले होते.पद्माकर काळे आणि अमोल शिंदें दोघे मराठा समाजातील दिगग्ज नेते म्हणून ओळखले जातात.

अमोल शिंदें यांनी विजयाची पताका हाती घेतली असून शिवसेनेच्या पॅनल मधील आणखीन दोघे निवडून आले आहेत. अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे असे तिघे विजयी झाले आहेत.


पालकमंत्री जयाभाऊ अन् भाजप आ.देवेंद्र दादाना नडनारा नेता

संपूर्ण सोलापूर शहराला उत्सुकता लागलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अनिकेत पिसे आणि मनोरमा सपाटे हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अमोल शिंदें आक्रमक झाले होते .अमोल शिंदेंनी थेट पालकमंत्री जय कुमार गोरेवर सडकून टीका केली होती.तर भाजप आमदार देवेंद्र कोठेना ओपन चॅलेंज दिले होते.

पालकमंत्र्याना आणि भाजप आमदाराला अंगावर घेणार नेता म्हणून अमोल शिंदेंची ओळख झाली होती.अमोल शिंदें हे शिवसेना शिंदें पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत.अमोल शिंदे यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप आमदार देवेंद्र कोठे यांना अंगावर घेतल्यामुळे या प्रभागाची उत्सुकता लागली होती.
एक जागा राष्ट्रवादीने लढवली होती मात्र निसटली


प्रभाग क्रमांक सातमधील लढतीकडे संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागले होते. या प्रभागातून शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने लढवली होती. या प्रभागातील शिवसेनेचे अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे हे तर भाजपच्या श्रद्धा पवार ह्या विजयी झाल्या आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुरुषोत्तम बरडे यांच्या कन्या उत्तरा बरडे, माजी उपमहापौर नाना काळे, आनंद कोलारकर यांचा पराभव झाला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments