Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय भोसले.

 टेंभुर्णी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय भोसले.


  उपाध्यक्षपदी राजेंद्र दडस तर सचिव पदी गणेश पोळ यांची निवड.


टेंभुर्णी (प्रतिनिधी): टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै.शिव निर्णयचे टेंभुर्णी प्रतिनिधी धनंजय भोसले यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी दै. सकाळचे भीमानगर प्रतिनिधी राजेंद्र दडस व दैनिक लोकमतचे गणेश पोळ यांची सचिव पदी निवड यांची करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष प्रा.हरिश्चंद्र गाडेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मुकुंद रामदासी व संस्थापक संतोष वाघमारे यांनी निवडी जाहीर केल्या. सर्वांच्या उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. शैक्षणिक सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात निर्भीडपणे पत्रकारिता करून संघास पुढे नेण्याचे कार्य यावर्षी केले जाईल असे नूतन अध्यक्ष भोसले यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी, संस्थापक संतोष वाघमारे, माझी अध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे, प्रा. हरिश्चंद्र गाडेकर, विनायक जोशी, सुहास कांबळे, सज्जन शिंदे, गणेश स्वामी, सोमनाथ निर्धार, सचिन जगताप, दीपक देशपांडे, आसिफ काझी, प्रदीप पाटील इत्यादी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments