Hot Posts

6/recent/ticker-posts

सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त ११ जानेवारीपासून पशुधन बाजार

 सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त ११ जानेवारीपासून पशुधन बाजार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त यंदाही येत्या ११ जानेवारीपासून पशुधन बाजारास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील मैदानात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती यात्रा समितीने दिली.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त दरवर्षी श्री रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरात भरणारा जनावरांचा बाजार महाराष्ट्रातील सीमाभागासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह या राज्यांतून जनावरे विक्रीसाठी दाखल होतात. विशेषतः खिलार बैल, गायी व म्हशींसाठी हा बाजार ओळखला जातो.

यात्रेनिमित्त यंदा ११ जानेवारीपासून जनावर बाजार भरणार आहे. २० जानेवारीपर्यंत बाजार चालेल. त्या पार्श्‍वभूमीवर यात्रा समितीने जय्यत तयारी केली आहे. जनावरांच्या बाजारासाठी महापालिकेने रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील जागा देवस्थानकडे हस्तांतरित केली आहे.

रोज ४० लाखांहून अधिकची उलाढाल

या जनावरांच्या बाजारात महाराष्ट्राच्या विविध भागासह तीन राज्यांतून २५ हजारांहून अधिक जनावरे विक्रीसाठी दाखल होता. रोज सुमारे ८० हून अधिक प्रकारच्या जनावरांची खरेदी-विक्री होते. तर यातून रोज ४५ लाखांहून अधिक उलाढाल होते. तसेच चारा, पशुखाद्य, पेंड यासह घंटा, दोरखंड विक्री यातूनही मोठी उलाढाल होते. बाजारस्थानी त्यांचे स्टॉल लागतात. त्याशिवाय चहा कँटीन, हॉटेल, खाद्यपदार्थांचे गाडेही लागतात. त्यातूनही मोठी उलाढाल होते.
Reactions

Post a Comment

0 Comments