शिवसेना चालक-मालक वाहतूक संघटना शहर उपप्रमुख पदी सद्दाम तवक्कल यांची निवड
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शिवसेना चालक-मालक वाहतूक संघटना मोहोळ शहर उपप्रमुख पदी सद्दाम तवक्कल यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शिवसेनेचे राज्याचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेश बारसकर यांच्या हस्ते देण्यात आले.
सद्दाम तवक्कल हे निष्ठावंत शिवसैनिक असून त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी म्हणाले की वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडून गोरगरिबांना शिवसेना चालक-मालक वाहतूक संघटना च्या माध्यमातून न्याय मिळवून देणार असल्याचे नवनियुक्त मोहोळ शहर उपप्रमुख सद्दाम तवक्कल यांनी सांगितले.

0 Comments