Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय रेखा कला परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

 शासकीय रेखा कला परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासकीय रेखा कला परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कलाशिक्षक संघाच्या वतीने सन्मान चिन्ह व पाचशे रुपये रोख रक्कम देऊन प्रतिवर्षी कै. इंडिकर सर माजी कलाशिक्षक यांच्या स्मरणार्थ देऊन सन्मानित करण्यात येते.

2025 साठी सदर पुरस्काराचे मानकरी सोलापूर मधून एकूण तीन विद्यार्थी आहेत. पैकी एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी धायफुले आर्णा नागेश (83 वा), आहेरकर ईशान राजेश (93 वा) आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी कोरे तन्मय बसवराज (77 वा) यांना सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम इंडियन मॉडेल स्कूल सांस्कृतिक भवन मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, सचिवा सायली जोशी व मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी मॅडम, राज्य सहसचिव शांतप्पा काळे, जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले, सचिव संतोष धारेराव यांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी सर्व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली व कलाविषयाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. संघटनेचे सचिव संतोष धारेराव यांनी आपल्या मनोगतात संघटनेचे कार्य व त्याची वाटचाल यावर सविस्तर विशद केले.

या कार्यक्रमात प्रशालेचे कलाशिक्षक अनिल रॉय, शैलेश कुलकर्णी, निलेश शिरसागर, राधिका देवणपल्ली व संघटनेतील सर्व पदाधिकारी, सदस्य व कलाप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका दिपाली इंगळे यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments