तडवळे सेवा केंद्रात हळदी कुंकू कार्यक्रम साजरा
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील तडवळे सेवा केंद्रात महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या स्व स्वरूप संप्रदाय तडवळा सेवा केंद्रात महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला.या मध्ये गावातील महिलांना मानाचे हळदी कुंकू लावून पिढ्यान् पिढ्या चालत आलेली परंपरा गत पान सुपारी, तिळ गुळ,लुटण्याचे समान देऊन आनंद लुटून घेतला.या कार्यक्रमास अध्यक्षा दिपाली भांड,महिला अध्यक्षा वर्षा कदम,सोनाली कोरडे,सुवर्णा होगले,पूजा गायकवाड,राज्यश्री गुळवे, विद्या कोरडे,श्वेता नाडे,नीता डोलारे,यांनी कार्यक्रम पार पाडला.कार्यक्रम झाल्यावर महिलांनी चहा,सेल्फी चा चांगलाच आनंद लुटला.या वेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 Comments