नरखेड(कटूसत्य वृत्त) :- राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची तालुकास्तरीय निवडणुकांमध्ये भक्कम वादविवादाची सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड गट हा या राजकीय संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.
तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गटात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत हायव्होल्टेज व काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यानंतर माजी राज्यमंत्री शहाजीराव पाटील आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वामुळे हा गट नेहमीच चर्चेत राहिला आहे. यंदा अनगर नगरपंचायत स्थापन झाल्यामुळे काही गावे नरखेड गटात समाविष्ट करण्यात आली आहेत.
२०१७ च्या निवडणुकीत उमेश पाटील यांनी नरखेड गटातून विजयी मिळवला होता, मात्र नव्या आरक्षणानुसार हा गट पुन्हा सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षित झाला आहे. यावेळी उमेश पाटील यांनी मतदारसंघ बदलून कुरुल गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नरखेड गटात त्यांचा मोठा बंधू संतोष पाटील शिवसेनेतून निवडणूक लढवणार आहे.
नरखेड गटातील माजी आमदार राजन पाटील यांचा ग्रामपंचायत, विकास संस्था व डीसीसी बँकेच्या माध्यमातून समर्थक वर्ग आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला असून, भाजपकडून वाळूजच्या ज्योत्स्ना पाटील, एकुरकेचे जगन्नाथ कोल्हाळ, नरखेडचे सोमेश क्षीरसागर आणि यल्लमवाडीचे लखन शिंदे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून संतोष पाटील निवडणूक लढवणार आहेत.
शेतकरी संघटनेचे अनिल पाटील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर शिरापूर पंचायत समितीसाठी भाजपकडून अलका नवनाथ मसलकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सायली सचिन चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.नरखेड गटातील ही निवडणूक हायव्होल्टेज आणि काट्याच्या लढतीची ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
0 Comments