Hot Posts

6/recent/ticker-posts

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आई रूपा भवानी मंदिरात सी. ए. सुशिल बदपट्टे यांना पूजेचा मान

 शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आई रूपा भवानी मंदिरात सी. ए. सुशिल बदपट्टे यांना पूजेचा मान

सोलापूरकरांच्या सुख-समृद्धीसाठी आई चरणी प्रार्थना

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूरचे आराध्य दैवत आई रूपा भवानीच्या मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र दिवशी प्रभाग क्रमांक ४ मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सी. ए. सुशिल बदपट्टे यांना आई रूपा भवानीच्या पूजेचा मान मिळाला.

मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून सी. ए. सुशिल बदपट्टे यांनी आई रूपा भवानीच्या चरणी सोलापूर शहराच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. यावेळी बोलताना बदपट्टे म्हणाले, “आई रूपा भवानीच्या मंदिरात शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेचा मान मिळणे हे माझे मोठे सौभाग्य आहे. आईचा आशीर्वाद कायम सोलापूरकरांवर राहो, शहरावरील सर्व संकटे दूर होवोत आणि सोलापूर प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करो, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे.”


शाकंभरी पौर्णिमा हा सण निसर्ग, अन्नधान्य व समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावून आई रूपा भवानीचे दर्शन घेतले.

दरम्यान, आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सी. ए. सुशिल बदपट्टे यांनी धार्मिक परंपरेचे पालन करत समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याने उपस्थित भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. मंदिर परिसरात शांततापूर्ण वातावरणात पूजा विधी पार पडले.

Reactions

Post a Comment

0 Comments