खोट्या बातम्या व खंडणीच्या आरोपांबाबत जाहीर खुलासा
जनजागृती प्रबोधन मंचचा आरोप; सहा जणांची सेवा समाप्त
उच्च न्यायालयात याचिका; नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जनजागृती प्रबोधन मंच या संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर खुलाशानुसार, महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष असल्याचा दावा करणारे श्री. बाळासाहेब पारवे यांचा जनजागृती प्रबोधन मंच या संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही काही व्यक्ती संगनमताने खोट्या व चुकीच्या बातम्या प्रसारित करून संस्थेची बदनामी करत असल्याचा गंभीर आरोप संस्थेने केला आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, 1. श्री. वसंत बाबासाहेब पाटील, 2. श्री. अनिल वसंत कांबळे, 3. श्री. उमेश मारुती कोळेकर, 4. श्री. लक्ष्मण भिमराव खरात, 5. श्री. शशिकांत राजाराम गायकवाड व 6. श्री. दिपक भगवान गेनगे या सहा व्यक्ती संस्थेच्या सेवेत हजर न राहिल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती. मात्र त्याचा राग मनात धरून त्यांनी श्री. बाळासाहेब पारवे यांच्यासह इतर व्यक्तींशी संगनमत करून आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात विविध शासकीय कार्यालयांसमोर धरणे-आंदोलने करणे, स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून खोट्या व चुकीच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध करणे, तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव आणण्याचे प्रकार केल्याचा आरोप संस्थेने केला आहे.
या प्रकारांमुळे संस्थेची नाहक बदनामी होत असून, श्री. बाळासाहेब पारवे यांच्याकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा तसेच खंडणीची मागणी करण्यात येत असल्याचा दावाही जनजागृती प्रबोधन मंचने केला आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तींविरोधात यापूर्वी सदर बाजार पोलीस स्टेशन, सोलापूर तसेच पो.स्टे. कामती, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे खंडणी मागणीप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, वरील सहा व्यक्तींनी खोट्या तक्रारी देऊन शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत, श्री. स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था संचलित, मूकबधिर निवासी शाळा, सांगोला येथे जबरदस्तीने घुसखोरी केल्याप्रकरणी संबंधित संस्थेने मुंबई उच्च न्यायालय, सर्किट बेंच कोल्हापूर येथे WRIT PETITION NO. (ST) 25025 OF 2025 दाखल केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, श्री. बाळासाहेब पारवे यांच्या विरोधात जनजागृती प्रबोधन मंचने WRIT PETITION NO. (ST) 31982 OF 2025 अन्वये उच्च न्यायालय, सर्किट बेंच, कोल्हापूर येथे स्वतंत्र याचिका दाखल केल्याची माहितीही देण्यात आली आहे.
संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या या जाहीर खुलाशात, श्री. बाळासाहेब पारवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी युट्युब चॅनेल, पत्रके किंवा वृत्तपत्रांमधून प्रसारित केलेल्या खोट्या व चुकीच्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असून, सत्य न्यायालयातच स्पष्ट होईल, असा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे. (ADVT)


0 Comments