Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षीचे व्यक्तिमत्व भारावून टाकणारे- डॉ.चंद्रकांत कोळेकर

 सहकार महर्षीचे व्यक्तिमत्व भारावून टाकणारे- डॉ.चंद्रकांत कोळेकर




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी यांची सर्वांच्या विकासासाठी असणारी अहोरात्र धडपड गोरगरीब विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेची उभारणी करून हे विश्व निर्माण केले त्याचा उपयोग आपणा सर्वांना होत आहे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जोपासणारे सहकार महर्षी यांचे व्यक्तिमत्व भारवून टाकणारे असल्याचे मत माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर यांनी व्यक्त केले.
                               ते नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त १२ ते १४ जानेवारी पर्यंत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथील माजी प्राचार्य डॉ.डी.एस.बागडे, नातेपुते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर, प्र. प्राचार्य रज्जाक शेख, प्र.प्राचार्य बाळासाहेब निकम, एन.के.साळवे
( आर.पी.आय नेते ) ,लतीफ नदाफ,मनोज राऊत, सुनील ढोबळे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सहकार महर्षी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सहकार महर्षी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १२ ते दिनांक १४ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. यामध्ये पारंपरिक दिन व सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, वाद-विवाद,अंताक्षरी स्पर्धा,भित्ती पत्रिका,घोषवाक्य व सुविचार लेखन,काव्यवाचन,समूह गीत,गीत गायन, मेहंदी स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,पुष्प सजावट इ.कार्यक्रम घेण्यात आले.माजी प्राचार्य डॉ.डी.एस.बागडे यांचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बाळासाहेब निकम यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र साठे तर आभार प्रदर्शन प्रा.उत्तम सावंत यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन प्रा.सौ.पुष्पा सस्ते, प्रा. एन.डी. देशपांडे व सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य यांनी केले.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments