विद्यापीठाच्या ‘२०२६ दैनंदिनी’ डायरीचे प्रकाशन!
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सांस्कृतिक वाटचालीचे प्रतिबिंब असलेल्या ‘२०२६ दैनंदिनी’ डायरीचे प्रकाशन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते बुधवारी पार पडले.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, दैनंदिनी समितीचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे, डॉ. अंजना लावंड, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सी.ए. महादेव खराडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. प्रभाकर कोळेकर, उपकुलसचिवा अर्चना साळुंखे, सहायक कुलसचिव आनंद पवार, मलकारसिद्ध हैनाळकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दैनंदिनीचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यापीठाची दैनंदिनी ही केवळ दिनदर्शिका नसून विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय पारदर्शकता व सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्यासाठी ही दैनंदिनी मार्गदर्शक ठरेल.
‘२०२६ दैनंदिनी’ डायरीमध्ये विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची सविस्तर माहिती, उच्च शिक्षण विभागाशी संबंधित माहिती, विद्यापीठ गीत, महाराष्ट्र गीत, भारतीय संविधानाची उद्देशिका, विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची माहिती, पदाधिकारी व अधिकाऱ्यांची यादी, राज्यातील विद्यापीठांची माहिती, शासकीय सुट्ट्या तसेच विविध उपयुक्त व संदर्भात्मक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सुबक मांडणी व उपयुक्त आशयामुळे ही दैनंदिनी सर्व घटकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. सदरच्या दैनंदिनी डायरीसाठी सांख्यिकी सहायक मुकतार शेख यांचे कार्यालयीन सहयोग लाभले आहे.

0 Comments