शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नाईक तर उपाध्यक्षपदी पवार यांची निवड
मोडनिंब (कटूसत्य वृत्त):- पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, मोडनिंब येथे सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठी बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पालक सभा शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या पालक सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश शहाजी नाईक यांची तर उपाध्यक्षपदी विजयनाथ अशोक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रत्येक वर्गातून जस्मिन नवाज शेख, प्रियंका महेश सरवदे, तृप्ती अनिल शिंदे, शहाजी संदिपान माळी, पिंकू समाधान चव्हाण, विजयनाथ अशोक पवार, किरण हरी खडके, दिपाली बालाजी गायकवाड, धनश्री अमर ओहोळ, अनिल शामराव शिंदे, रेश्मा औदुंबर मोहिते, सिद्धेश्वर केशव साळुंखे, गणेश शहाजी नाईक व सुजाता सतीश ओहोळ या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याशिवाय, शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून बालाजी वाघमारे यांची पालक सभेत गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून रत्नप्रभा जाधव, तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आरुषी पाटील व सृष्टी जाडकर यांची निवड करण्यात आली.
या पालक सभेसाठी विस्ताराधिकारी डॉ. शिवराज ढाले, तसेच मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक राजन सावंत हे उपस्थित होते. संपूर्ण निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक हरिभाऊ जाधव व सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.
सभा शांततेत पार पडावी यासाठी पोलीस कॉन्स्टेबल देवकर साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नव्याने निवड झालेल्या समितीमुळे शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी पालक व शिक्षकवृंदाने व्यक्त केला.

0 Comments