व्यवसायिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी कठोर परिश्रम करा- पुनम कोकळगी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- शिक्षण घेत असताना ध्येय निश्चित करू कठीण परिश्रम घेऊन व्यवसायिक कौशल्य आत्मसात केल्यास जीवनात यश मिळते असे प्रतिपादन ज्युनिअर विभाग प्रमुख पुनम कोकळगी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ. सुरेखा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक महाविद्यालयाने कला वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्रा. सलोनी शहा, प्रा. गुरुशांत हपाळे, प्रा.शिवकुमार मठदेवरू, प्रा.शितल टिंगरे उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,व्यक्तिमत्त्वाचा विकास तुम्ही कसे दिसता यावर नसतो तर तुम्ही किती कर्तबगार आहात यावर असतो. म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यवसायिक कौशल्य आत्मसात करून कर्तबगार झाले पाहिजे तर कुटुंबीय व समाज तुमची तारीफ करेल.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक कै.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कु. जैस्वाल, चव्हाण, सोलनकर, बेडगे, त्रिगुळे, धर्मसाले, चिक्कमळी, तानवडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री तोळणुरे यांनी केले सूत्रसंचालन कु.प्रसन्न पवार यांनी केले.
आभार कु. मयूर देशमुख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका हर्षदा गायकवाड, विजयालक्ष्मी वाले, शितल फुटाणे यांनी प्रयत्न केले.
चौकटीतील मजकूर
विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी परिश्रम घ्यावेत
परीक्षा पद्धत कठीण असते. वाचन, चिंतन व सराव करून प्रश्नांची उत्तरे लिहिली तर गुणांकन वाढते असा विद्यार्थ्यांना कानमंत्र मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी यावेळी दिला.
.jpg)
0 Comments