Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक उत्साहात संपन्न

 शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक उत्साहात संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे,स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून व सर्वानुमते 16 जानेवारी 1681 रोजी स्वराज्याचे पहिले युवराज संभाजी महाराज यांना रयतेने छत्रपती बनवले तोच हा आजचा दिवस होय.हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती दर साल प्रमाणे आयोजित करते.यावर्षी समितीचे 9 वे वर्ष आहे यानिमित्ताने समितीतर्फे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसराची सजावट केली होती सकाळी ठीक नऊ वाजता उपस्थित मान्यवर महिला व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून ध्वज पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या 13 फुटी पुतळ्यास खास दक्षिणात्य  पद्धतीचा 9 फुटाचा हार घालून समितीतर्फे मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली या वेळचे राज्याभिषेक चे  प्रमुख अतिथी माननीय श्री विक्रम बापू खेलबुडे साहेब (अध्यक्ष सोलापूर श्रमिक पत्रकार संघ ) हे आपल्या पत्रकारिच्या पेशातून समाजात सत्य परिस्थिती सांगण्याचा कायम प्रयत्न करतात त्याच बरोबर पत्रकारिकेच्या पेशातून समाज उपयोगी व सामाजिक कामास नेहमी प्रोत्साहन देतात ते विक्रमी 13 वेळा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत पत्रकारांच्या प्रश्नासाठी ही ते कायम अग्रेसर असतात त्यांच्या प्रयत्नातून सोलापुरातील पत्रकारांना स्वतःच्या हक्काचे घर मिळत आहे आणि पत्रकार हा आपल्या भारतीय लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आहे त्यामुळे यावर्षीचा राज्याभिषेक करण्याचा मान त्यांना देऊन समितीने भक्ती शक्ती साम दाम दंड भेद  यांचा संगम करून आपली वेगळीक्ता राज्याभिषेक सोहळा समितीने जपलेली आहे.त्याचबरोबर मस्साजोग, बीड चे सरपंच स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांचे बंधू श्री धनंजय भैया देशमुख व कुटुंबीय यांनाही यावर्षीचा राज्याभिषेक करण्याचा मान समितीच्या वतीने देऊन स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
तसेच राज्याभिषेक करणाऱ्या प्रमुख मान्यवरांचा म्हणजे श्री विक्रम बापू खेलबुडे व श्री धनंजय भैय्या देशमुख कुटुंबीयांचा   शाल श्रीफळ  व स्मृतिचिन्ह म्हणून संभाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 
त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून दैनिक संचार चे उपसंपादक नंदकुमार येच्चे साहेब उपस्थित होते त्यांचाही समितीच्या वतीने विशेष स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याचबरोबर पत्रकार क्षेत्रातील अग्रेसर असलेले दोन युवा पत्रकार श्री प्रमोद जी बोडके व श्री विशाल जी भांगे यांना यावर्षीचा शिवश्री सन्मान पुरस्कार समितीच्या वतीने देऊन त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला 
 त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब व उपायुक्त विना पवार मॅडम यांचाही समितीच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व शिवशंभू मावळ्यांना आनंदोत्सव म्हणून समितीच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
 त्याचबरोबर छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे निमित्त साधून दर साल प्रमाणे समितीच्या वतीने शिवशंभू मावळ्यांच्या वतीने भव्य रक्तदानाचे आयोजन केले होते स्वच्छने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास राज्याभिषेक समितीतर्फे प्रेरणादायी स्मृतिचिन्ह म्हणून शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची एक फुटी मूर्ती स्मृतिचिन्ह म्हणून  देण्यात आली यावेळी स्वतः श्री धनंजय भैया देशमुख यांनीही रक्तदान केले व त्यांच्या बरोबर  बहुसंख्य शिवशंभू मावळ्यांनी पाईकांनी यात स्वच्छने रक्तदान केले. 
 यानंतर समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून कार्यक्रमाची समाप्ती सांगता केली यात प्रामुख्याने कोणत्याही संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता. हा कार्यक्रम फक्त शिवशंभू पाईकांनीच आयोजित केला होता याचे प्रमुख आयोजन शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती सोलापूर शहर जिल्हा हे होते.यातील प्रमुख सदस्य श्री शिरीष भैया जगदाळे प्रकाश ननवरे संभाजी भोसले शाम कदम गोवर्धन गुंड सचिन चव्हाण शेखर भोसले प्रशांत देशमुख संतोष सुरवसे दिलीप भोसले सदाशिव पवार सर  शेखर जगदाळे  परशुराम पवार अजय सोमदळे सुयश जाधव लिंबराज जाधव राजीव व्यवहारे प्रकाश डोंगरे नितीन मोहिते जयसिंगराव भोसले राम माने उज्वलाताई साळुंखे सौ भांगे मॅडम सौ अश्विनी जगदाळे सौ सुवर्णा शितोळे मनीषा कोळी सौ पवार मॅडम   यांच्यासह राजकीय सामाजिक उद्योग विश्वातील मान्यवर व शिवशंभू भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Reactions

Post a Comment

0 Comments