शंभूराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा बार्शीत दिमाखात संपन्न
बार्शी (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग व स्वाभिमानाची आठवण करून देणारा शंभूराज्याभिषेक सोहळा छावा प्रतिष्ठानच्या वतीने बार्शी येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. शिवशंभू भक्तांच्या घोषणांनी आणि सनई-चौघड्याच्या निनादात परिसर शिवमय झाला होता.
या भव्य कार्यक्रमास बार्शीचे तहसीलदार मा. एफ. आर. शेख साहेब, बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, साईसंजीवनी हॉस्पिटलचे संचालक राहुल मांजरे, बार्शीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रोहित पाटील, नगरसेवक दीपक राऊत, भैय्यासाहेब बारंगुळे, आकाश राऊत, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, मार्गदर्शक विनायक (मामा) घोडके, शिवराज करिअर अकॅडमीचे संचालक विशाल कोलगे, शौर्य करिअर अकॅडमीचे संचालक श्री कोळी, अभीरक्षा इन्शुरन्सचे संचालक हनुमंत पवार, राहुल वाणी, सुमित बारंगुळे, अजय पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला सनई-चौघड्याच्या सुरात दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला. शिवकालीन तोफेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात वीरश्रीचे तेज पसरले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व राष्ट्रहिताचे उपक्रम राबवणाऱ्या संघटनांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवराज्य सेना, ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था, स्व. बापूसाहेब मुळे बहुउद्देशीय संस्था, छत्रपती संभाजी नगर मित्र मंडळ,रौद्र शंभो प्रतिष्ठान, धर्मवीर प्रतिष्ठान, धर्मरक्षक प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी राजे युवा मंच, शिवयुग प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव सोहळा समिती, छत्रपती ग्रुप खांडवी, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान उपळाई ठोंगे, छावा प्रतिष्ठान शिरसाव या संघटनांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्व शिवशंभू भक्तांसाठी छावा प्रतिष्ठानच्या वतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य शिवभक्तांनी अथक परिश्रम घेतले.
शंभूराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

0 Comments