अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 9, 2025

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई

                अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई



                                                      तहसिलदार- सचिन लंगुटे

                                                                              

पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सात लाकडी होड्या तसेच थर्माकोलचे तराफे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून नष्ट करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे  यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध  पथकांची  नेमणूक केली आहे. भीमा नदी पात्रातील  चिंचोली भोसे  येथे चार व इसबावी येथे तीन लाकडी होड्या तसेच पंढरपूर जवळील असणाऱ्या नगरपालिका बंधाऱ्यालगत वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोलचे तराफे नष्ट केले आहेत.  सदरच्या दोन्ही  कारवाई महसूल पथकाने सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजताच्या दरम्यान केली. या कारवाईमध्ये सुमारे आठ लाख रुपये किमतीचे अवैध गौण खनिज वाहतुकीसाठी व चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य नष्ट करण्यात आले आहे.

या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण व ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील, गणेश पिसे, प्रमोद खंडागळे, संजय खंडागळे, योगेश कदम, विराज लोटेकर, दिगंबर डोईफोडे, सुमित जाधव, नितीन कोलगे, सागर जगताप, समीर पटेल व महेश कुमार सावंत व पंढरपूर शहर पोलीस विभागातील पाटील व सर्जे हे सहभागी होते..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages