Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांचे व माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे- डॉ. दामा

 विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांचे व माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे- डॉ. दामा




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- ‘विद्यार्थ्यांनी मी, माझा देश आणि माझा समाज यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. यासाठी शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. महाविद्यालयाची प्रगती ही सर्वस्वी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून आहे आणि विद्यार्थी प्रगत झाला तर शिक्षकांची खरी प्रगती होत असते. यासाठी शिक्षकांनी देखील प्रयत्नशील राहावे. त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांनी फावल्या वेळेत आपण शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयात जावून तेथील विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन केल्यास विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल. एकूणच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांचे व माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे आहे.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्र.कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.  
          गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) यांचा ‘ऋणानुबंध २०२५’ हा माजी विद्यार्थी मेळावा व २०२५ च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘पदवीप्रदान सोहळा’ हे कार्यक्रम घेण्यात आले. हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र.कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा हे मार्गदर्शन करत होते. सुरवातीला प्रा. अविनाश मोटे यांनी ‘माजी विद्यार्थी असोसिएशनचा लेखा-जोखा मांडला. माजी विद्यार्थी मेळाव्याला २००३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी विजयकुमार भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. स्वेरीच्या २००३ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी व ‘एमफासेस’ या कंपनीच्या मृणाल पाटील ह्या देखील उपस्थित होत्या. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांंना आपल्या जबाबदारीची जाणीव राहावी यासाठी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. शपथ पत्राचे वाचन प्र.कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. ‘ऋणानुबंध २०२५’ या माजी विद्यार्थी मेळाव्याला देशभरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. प्र.पाहुणे विजयकुमार भोसले म्हणाले कि, ‘करिअर करण्यापूर्वी आपण जे शिक्षण घेता त्यात क्वालिटी असावी. आपण किती काम करता यापेक्षा आपण किती गुणवत्तापूर्ण कार्य करता हे महत्वाचे असते. म्हणून आपल्या कामात एकाग्रता आणि गुणवत्ता असावी.’ असे सांगून जागतिक बाजारपेठेत कंपन्यांचे स्थान काय असते हे स्पष्ट केले. यशस्वी उद्योजक असलेले स्वेरीचे माजी विद्यार्थी सुभाष काकडे  म्हणाले की, ‘बाहेरील विश्वात स्वेरीतील शिक्षण एक न संपणारा ऑक्सिजन ठरते यासाठी स्वेरीत शिक्षण घेणे हा माझा टर्निंग पॉइंट ठरला असून तमाम विद्यार्थांना माझे एकच सांगणे आहे की ध्येयवेडे व्हा, कोणत्याही कामाला लाजू नका, प्रामाणिक कष्ट करा, निश्चित यशापर्यंत पोहचाल, हे मी अनुभवाने सांगतो.’ दिल्लीतील ‘इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्च’ या संस्थेकडून ‘अॅग्रीकल्चर’ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उद्योजक असलेल्या सुभाष काकडे यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रेरणादायी कार्य करत असल्याबद्धल काकडे यांना विशेष सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या कार्यातून स्वेरीचे माजी विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा यशस्वीपणे उमटवू शकतात, हेच सिद्ध झाले. यावेळी ॲल्युमिनी असोसिएशनच्या वतीने महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी कार्यकर्मानंतर वर्गात जावून विद्यार्थ्यांच्या भेटी घेवून पुढील मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी करिअर करताना आत्मविश्वास आणि प्रामाणिक कार्य केले पाहिजे हे ठासून सांगितले. पदवीप्रदान समारंभ प्रसंगी इमारतीच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य रंगमंचापर्यंत परीक्षा विभागाचे स्वेरीचे नियंत्रक डॉ.एस.ए.लेंडवे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदंडाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये सर्व मान्यवर, संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, इंजिनिअरिंग व फार्मसीचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, पदवीधर व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ॲल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, एचसीएल कंपनीचे डॉ. योगीराज दामा, संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरीचे परीक्षा नियंत्रक डॉ. सतीश लेंडवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके यांनी आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments