नामनिर्देशन अर्ज विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद; एकही अर्ज दाखल नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 24, 2025

नामनिर्देशन अर्ज विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद; एकही अर्ज दाखल नाही

 नामनिर्देशन अर्ज विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद; एकही अर्ज दाखल नाही




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक २३-१२-२०२५  रोजी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली.
आज झालेल्या नामनिर्देशन अर्ज विक्रीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
निवडणूक निर्णय अधिकारी -१ : १६७
निवडणूक निर्णय अधिकारी-२ : १९२
निवडणूक निर्णय अधिकारी-३ : १३०
निवडणूक निर्णय अधिकारी ४ : १२०
निवडणूक निर्णय अधिकारी-५ : १७१
निवडणूक निर्णय अधिकारी-६ : १२६
निवडणूक निर्णय अधिकारी-७ : १६८
एकूण १०७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली आहे.नामनिर्देशन अर्ज विक्रीची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासकीय इमारतीतील निर्धारित कक्षामध्ये सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० या वेळेत शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पद्धतीने पार पाडण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरताना मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निर्गमित केलेल्या आदर्श आचारसंहिता व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. तसेच,महानगरपालिकेकडून आवश्यक असलेली ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) व इतर अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता करून विहित कालमर्यादेत नामनिर्देशन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे, अर्ज छाननी, उमेदवारी अर्ज माघार व मतदान प्रक्रिया या सर्व बाबी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार आहेत. यासंबंधीची सविस्तर माहिती वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages