महाप्रसाद सेवेच्या माध्यमातून निराधार दिव्यांगांची सेवा- लोहिया - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 8, 2025

महाप्रसाद सेवेच्या माध्यमातून निराधार दिव्यांगांची सेवा- लोहिया

 महाप्रसाद सेवेच्या माध्यमातून निराधार दिव्यांगांची सेवा- लोहिया





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे धार्मिक, सामाजिक व्यासपीठ आहे, मंडळाने गेल्या ४ वर्षापूर्वी सुरु केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेच्या माध्यमातून निराधार दिव्यांगांची सेवा घडत आहे हीच खरी परमेश्वराची सेवा असल्याचे मनोगत राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मनोजकुमार लोहिया यांनी व्यक्त केले.


ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी पोलीस निरीक्षक दिपक भिताडे उत्तर पोलीस ठाणे, पो.शि.धोंडीबा डेंगळे, मनोज निकम, सिध्देश्वर मोरे, सनी सोनटक्के, निखील पाटील, प्रवीण घाडगे, विजय गोटू माने, बाळासाहेब पोळ, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages