चव्हाणवाडीत विकासाला गती! ‘ज्योतिबा मंदिराचा भव्य सभामंडप श्रद्धा-सुविधेचा संगम ठरेल’ — आ. अभिजीत पाटील*
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- चव्हाणवाडी (टे) येथील नांगरे वस्तीतील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिराच्या नवीन सभामंडपाच्या उभारणीस आज अधिकृत सुरुवात झाली. आमदार निधीतून मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या कामाचे विधिवत भूमिपूजन माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या प्रसंगी देवस्थानच्या वतीने आमदार अभिजीत पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्यासमवेत उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, माजी सरपंच प्रमोद कुटे तसेच डी.व्ही.पी. बँकेचे चेअरमन औदुंबर देशमुख यांचाही देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भूमिपूजनप्रसंगी बोलताना आमदार अभिजीत पाटील यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “ज्योतिबा मंदिर परिसरात उभारला जाणारा हा सभामंडप केवळ बांधकाम नसून श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक एकोपा यांचे प्रतीक ठरेल.” या सभामंडपामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनासाठी बसण्याची उत्तम व सुरक्षित सोय उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी चव्हाणवाडी गावातील स्मशानभूमीचा प्रश्न गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट करत, “हा प्रश्न येत्या दोन-तीन महिन्यांत निश्चितपणे मार्गी लावला जाईल,” असे ठाम आश्वासन ग्रामस्थांना दिले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान नवनाथ शिंदे यांनी नव्याने खरेदी केलेल्या जेसीबी मशीनची पूजा आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली
*चौकट : ऊस उत्पादकांना दिलासा*
गावातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना उद्देशून बोलताना आमदार पाटील म्हणाले की, साखर कारखाने सुरू होऊन ५० ते ५५ दिवस झाले असून पुढील किमान तीन महिने गाळप हंगाम सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने घाबरून जाऊ नये. “या गावातील शेतकऱ्यांचा एक टिपर ऊसही शिल्लक राहणार नाही,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, डी.व्ही.पी. बँकेचे चेअरमन औदुंबर देशमुख, माजी सरपंच प्रमोद कुटे, अरुण चव्हाण, माजी सरपंच नवनाथ शिंदे, सुभाष इंदलकर, माजी सरपंच भागवत खडके, नागेश माळी, अनिल नांगरे, विजय कदम, जमाल काझी, सुधीर पाटील, नितीन चव्हाण (वायरमन), सुधीर नांगरे, मंगेश इंदलकर, शशिकांत नांगरे, युवराज मिस्किन, श्याम नांगरे, ज्योतीराम शिंदे, सचिन शिंदे, सागर चव्हाण, विष्णू महालिंगडे, सोमनाथ गायकवाड (वरवडे), संदीप कुटे, दत्तात्रय गायकवाड, निलेश पवार, गणेश नांगरे, नितीन नांगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज नांगरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुधीर नांगरे यांनी मानले.

0 Comments