Hot Posts

6/recent/ticker-posts

वाळू माफियांची दहशत: माहिती दिल्याच्या संशयावर वकिलावर रॉडने प्राणघातक हल्ला

 वाळू माफियांची दहशत: माहिती दिल्याच्या संशयावर वकिलावर रॉडने प्राणघातक हल्ला





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील अवैध वाळू उपसा माहिती दिल्याच्या संशयावरून एका तरुण वकिलावर शनिवारी सकाळी प्राणघातक दगड-लोखंडी रॉड व दांडक्यांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या ॲड. पांडुरंग कुबेर तोडकर (वय ३२, वकिल व शेतकरी, रा. अकोले खुर्द) यांच्यावर सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेंभुर्णी पोलिसांनी १२ ते १३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.टेंभुर्णी पोलीस स्टेशन कडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की 
,दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांनी त्यांच्या शेतात पाणी देताना मागून कोणीतरी पाठलाग केल्याचा संशय आला. मित्र लखन कुटे यांनी विक्रम पराडे याला फोन करण्याची सूचना केली. टेंभुर्णीतील योगीराज पेट्रोल पंप जवळील त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी गेल्यावर, विक्रम पराडे आणि त्याचे सहकारी आरोपी त्यांना भेटून “तू आमच्या अवैध वाळू उपसाबाबत पोलिसांना माहिती दिलंस का?” असा आवाज येताच त्यांच्यावर दगड, लोखंडी रॉड, दांडके आणि अँगलसारखी घातक शस्त्रे हातात घेत हल्ला केला.या अमानुष मारहाणीमध्ये तोडकर यांना शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा, उजव्या पायाच्या नडगीला फ्रॅक्चर, तसेच डाव्या हाताच्या करंगळीशेजारी दोन बोटांची फ्रॅक्चर झाली.  हा हल्ला जीव घेण्याच्या हेतूने केला गेला असल्याचे स्पष्ट आहे.हल्ला करणारे आरोपी काळ्या रंगाच्या थार व स्कॉर्पिओ या वाहनांतून आले होते, आणि दोन्ही वाहनांना नंबर प्लेट नव्हती, त्यामुळे संशय अधिक वाढला आहे.जखमी अवस्थेत तोडकर यांना तातडीने पुणे येथील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, 
 त्यानंतर शिवाजीनगर पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो झिरो ने दिनांक ८ डिसेंबर रोजी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून वरील फिर्यादीनुसार  भा. द. वी. कलम १०९, ११८(२),भारा ३५१(३), १८९(४), १९१(३), १९० कलम १३५ प्रमाणे
टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करीत आहेत 

*चौकट*
*याघटने मुळे माढा तालुक्यात वाळू, मुरूम माफियांच्या वाढत्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या 
अवैध वाळू उपशामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामध्ये महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार आहेत का असे नागरिकांतून बोलले जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments