पत्रकार म्हणजे शासन-प्रशासन व जनतेमधील दुवा- शशिकांत चव्हाण
कुरुल (कटूसत्य वृत्त):- समाज, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या अडीअडचणी, दैनंदिन जीवनातील व्यवहार, शासकीय प्रशासकीय कामे शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सामान्य माणसाला साडीवरची कसरत करावी लागते ही वस्तुस्थिती आहे. मात्र राज्यात देवेंद्र व देशात नरेंद्र सरकार आल्यापासून या अडीअडचणी कमी झाल्यात हे बहुअंशी मान्य करावे लागेल. तरीही जनतेचे प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार हा महत्त्वाचा दुवा असून प्रत्येक पत्रकार माझ्याकडे राजकारणी म्हणून न पाहता एक मित्र म्हणून नेहमीच सल्लागार ठरतो असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी केले.
कामती खुर्द येथील सिनाई ऍग्रो अँड टुरिझम येथे अंकुश भैय्या अवताडे यांनी पत्रकारांसाठी थोडा पार्टी व औपचारिक गप्पांचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कार्यकारणी सदस्य शंकर नाना वाघमारे, माजी नगरसेवक सुशील क्षीररसागर व राजेंद्र बापू सुरवसे, राज्य परिषद सदस्य विश्वास चव्हाण, नागेश बापू डोंगरे, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, सुशांत हजारे, कपिल हजारे, अजित लेंडवे, ऋषिकेश चव्हाण, अजित चव्हाण आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी हुकूम मुलानी, सचिन इंगळे, समाधान फुगारे, महादेव धोत्र, मल्लिकार्जुन देशमुख, संभाजी नागणे, विलास मासाळ, राहुल सोनवणे, प्रमोद विनवडे, पोपट इंगोले, श्रीनिवास तीर्थ, योगेश शिंदे, प्रकाश गव्हाणे, सुहास घोडके, विजय पुजारी, दत्तात्रय पांढरे, गोरक्ष गायकवाड, राहुल सोनवणे, सावता जाधव, भारत नाईक, किशोर मारकड आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments