Hot Posts

6/recent/ticker-posts

शिखर शिंगणापूर ते पिंपरी- कोथळे रस्ता दुरुस्तीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

 शिखर शिंगणापूर ते पिंपरी- कोथळे रस्ता दुरुस्तीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पिंपरी गांव विकास आघाडीचे संघटक नानासाहेब जयराम राणे यांनी शिखर शिंगणापूर रोड ते पिंपरी- कोथळे येथील वहिवाटीचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता दुरुस्तीबाबत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर रस्ता मंजूर करून दुरुस्ती करून द्यावा  अन्यथा कायदेशीर व सनदशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्याच्या तयारीत तेथील ग्रामस्थ असल्याचा इशारा पिंपरी गांव विकास आघाडीचे संघटक नानासाहेब जयराम राणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर दिलेल्या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की, पिंपरी, कोथळे व कारंडे ता. माळशिरस जि. सोलापूर या तीनही गावातील ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येते की, मागील १० ते १५ वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सरकारने सदरचा रस्ता अत्यंत चांगला केलेला होता. सदर रस्त्यामुळे वरील तीनही गावची दळणवळणाची फार मोठी सोय झालेली होती. सध्या सदरच्या कायम वहिवाटीच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असून जागोजागी असणारे पूल त्यावरही खड्डे पडून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. आज अखेर सदर रस्ता अत्यंत खराब झालेला असल्यामुळे बरेच मोटार अपघात त्या विकाणी झालेले आहेत. शाळकरी मुले-मुली, वयस्कर प्रवासी, गरोदर महिला व या भागातील रयत शेतकरी या सर्वांसाठी हा रस्ता कायम वाहतुकीचा वअत्यंत वर्दळीचा आहे. सदर रस्त्याची गरज वरील तीनही गावाला  आसल्याने तो वाहतुकीस अजिबातच योग्य राहिलेला नाही. आपण तातडीने आपल्या खास दुतामार्फत पाहणी करावी व खास बाब व विशेष बाब समजून सदर रस्त्याची दुरूस्तीस तातडीने मंजूरी द्यावी ही या भागातील सर्व समस्त ग्रामस्थांची विनंती आहे. अन्यथा कायदेशीर व सनदशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्याच्या तयारीत ग्रामस्थ आसल्याचा इशारा देण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments