तपोरत्नं पुण्यस्मरण; नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 12, 2025

तपोरत्नं पुण्यस्मरण; नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रम

 तपोरत्नं पुण्यस्मरण; नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि.१२ डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा, शनिवार दि.१३ रोजी निबंध स्पर्धा, चित्रकला व रंगभरण स्पर्धा ,रविवार दि.१४ रोजी वक्तृत्व व श्लोक पाठांतर स्पर्धा, सोमवार दि.१५ रोजी हस्ताक्षर स्पर्धा, मंगळवार दि.१६ रोजी प्रश्न मंजुषा स्पर्धा, बुधवार दि.१७ रोजी रक्तदान शिबीर, सायंकाळी सहा वाजता तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे उदघाटन व इंद्रजित देशमुख (कराड) हे सुजाण पालकत्व या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. गुरुवार दि.१८ रोजी जितेंद्र आसोले ( गोंदिया) हे माणूस म्हणून जगताना या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत.शुक्रवार दि.१९ रोजी महांतेश हिरेमठ हे गुरु महात्म्य या विषयावर तिसरे व शेवटचे पुष्प कन्नड भाषेतून गुंफणार आहेत. शनिवार दि.२० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता अशोक चौक येथील नेताजी शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात लिं.श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या पादुकांचे रुद्राभिषेक व सहस्त्र बिल्वार्चन तदनंतर पादुकांचे, महास्वामीजींच्या प्रतिमेचे पुरवंतासह सवाद्य मिरवणूकीला प्रारंभ, मिरवणूक सुमारे दोन हजार भक्तगणांसह , विविध वाद्य वृंदासह, लेझीम, नृत्य, ढोल पथक अशोक चौक, आकाशवाणी रोड वरुन निलम नगर मार्गे सकाळी अकरा वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात आगमन होणार आहे. पादुकांचे महाआरती करुन मिरवणूकीची सांगता होणार आहे. त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान व मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.सायंकाळी आठ वाजता राजराजेश्वरी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा तपोरत्नं भाव भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रात्रो ठिक १०.०५ वाजता तपोरत्नं आत्मज्योतीचे दिपप्रज्वलन व श्रद्धांजली समर्पण कार्यक्रम होणार आहे तरी भाविक भक्तांनी  कार्यक्रमात सहभाग घेऊन गुरुकृपा आशीर्वादाचा लाभ घ्यावे असे आवाहन नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages