महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे यांच्यावर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्र काढले असून तश्या सुचना आणि माहितीची प्रत राष्ट्रवादीचे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना पाठवले आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाकडे जवळपास ४५० इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सोलापूरच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इतक्या मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे प्रदेश राष्ट्रवादीने आता लक्ष घातले आहे. सोलापूर शहरात भारतीय जनता पार्टीनंतर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची संख्या आहे.सर्व धर्मीयांचा सर्व समाज घटकांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जात असल्यामुळे इच्छुकांचा आकडा वाढला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सोलापूर राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री आहेत. निवडणुका तोंडावर असल्यामुळे आता नियोजन व प्रचार करून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे पत्र काढले असून सोलापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे हे सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी जातीने लक्ष घालणार आहेत.उमेदवार निवडण्यासह निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभा तसेच अन्य कार्यक्रमांचे नियोजन करणार आहेत. दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अभिनंदन केले आहे. तर सोलापूर राष्ट्रवादीने दत्तात्रय भरणे आणि अण्णा बनसोडे यांचे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीबद्दल सोलापूर शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, जेष्ठ नेते तौफिक शेख,जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांनी अभिनंदन करून या निवडीबद्दल स्वागत केले आहे.
.png)
0 Comments