Hot Posts

6/recent/ticker-posts

दुष्कर्म केल्याप्रकरणी नृत्य शिक्षकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर- ॲड. रितेश थोबडे

दुष्कर्म केल्याप्रकरणी नृत्य शिक्षकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर- ॲड. रितेश थोबडे 



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथील अल्पवयीन पीडीतेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी नृत्य शिक्षक विशाल दिगंबर पाटोळे राहणार पंढरपूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला.


यात हकीकतअशी की पीडिता ज्या गल्लीत राहात होती तिथे डान्स शिकवणारा डान्स टीचर विशाल पाटोळे हा पीडितेस डान्स क्लास साठी बोलवत असे व ते दोघे इंस्टाग्राम वर चॅटिंग करत असत. एप्रिल 2023 मध्ये वाढदिवसासाठी त्याने पीडितेस घाटावर बोलवले होते. त्यावेळी त्याने लग्न करतो म्हणून दुष्कर्म केले त्यानंतर देखील दोन ते चार वेळा दुष्कर्म केले .पीडितेचे डोके दुखत असल्यामुळे तिच्या आईने तीस डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेली होती .त्यावेळी डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले त्यावर पीडीतेस तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारले असता तिने वरील हकिकत सांगितली. त्यावर पीडितेच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यावरून विशाल पाटोळे यास अटक झाली होती.

आपणास जामीन मिळावा म्हणून विशाल याने जिल्हा व सत्र न्यायालयात पंढरपूर येथे जामीनाचा अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर विशाल याने आपणास जामीन मिळावा म्हणून कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणी वेळी ॲड. रितेश थोबडे यांनी आपले युतीवादात घटनेची फिर्याद उशिराने आहे तसेच गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आल्या असल्याचे मुद्दे मांडले ते ग्राह्य धरून न्यायाधीशांनी वीस हजार रुपयाच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर केला

यात अर्जदार तर्फे ॲड. रितेश थोबडे, ॲड. किरण सराटे यांनी तर सरकारतर्फे एस एस चौधरी यांनी काम पाहिले.

Reactions

Post a Comment

0 Comments