रस्ता खुला करण्याचे मागणीसाठी माढ्यात आमरण उपोषण
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
माढा तालुक्यातील तडवळे ते वडाची वाडी १०० वर्षांपासून चा शिव रस्ता जबरदस्तीने बंद करून शाळा कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय, अबालवृद्ध यांना वैद्यकीय सेवा मिळण्यास अडथळा निर्माण करणा-या व शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक ६० लाख रुपयांची शहाजी पाटील यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा व अडवलेला रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी बहुजन संघर्ष समितीचे नागनाथ वाघमारे यांचे नेतृत्वाखाली तडवळे ग्रामस्थ यांचे वतीने मंगळवार दि.२ पासून माढा पोलिस ठाण्यासमोर आमरण सुरू करण्यात आले आहे.
तडवळे(म) -वडाचीवाडी( त,म) रेल्वे पुल लगत शिवरस्ता सुमारे १००वर्षापासुन वहिवाट असुन शेतकऱ्यांकडून हा रस्ता येथील शहाजी पाटील याने अडविला असून
सर्व महसूल प्रशासन, तहसीलदार माढा, सर्कल कुर्दुवाडी, पोलिस प्रशासन माढा, भुमी अभिलेख, रेल्वे प्रशासन यांचे समोर शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून ६० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.हा रस्ता अडविला असल्यामुळे शाळा कौलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, अबालवृद्ध यांना वैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होत आहे त्यांच्या जीवनाशी खेळण्याचे प्रकार होत आहे. रस्ता बंद केल्याने शेती मालाचे नुकसान, जमीन वहीवाटीला पुर्ण बधण, लग्न समारंभ, बाजार हाट, व सर्वच दैनंदिन मुलभूत गरजा रस्त्याच्या अडवणुकीमुळे पूर्ण होत नाही.तो रस्ता खुला करावा व ६० लाखांची खंडणी माणा-या शहाजी पाटील यांचेवर गुन्हा दाखल करावा व त्याला पाठीशी घालणा-या अधिका-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसाठी विश्वनाथ हनुमंत परबत,शैलेश दिगाबर ढेरे,रमेश दिगाबर ढेरे,सुरेश दिगाबर ढेरे,पांडुरंग बळीराम परबत, रतन सुरेश ढेरे,अजना सुभाष ढेरे,रसीका रमेश ढेरे यांनी उपोषण सुरू केले आहे.

0 Comments